मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने जळगावकडे रवाना
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने जळगावकडे रवाना
लेवाजगत न्यूज, लातूर : राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अखेरीस त्यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला.
गुलाबराव पाटील हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे प्रचार सभेसाठी आले होते. सभा आटोपल्यानंतर ते जळगावकडे परतण्यासाठी विमानतळावर पोहोचले. मात्र, त्यांच्या खासगी विमानात तांत्रिक अडचण असल्याची माहिती मिळाली. विमानाची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि विमान दोन वेळा धावपट्टीवरही नेण्यात आले. तरीही बिघाड दूर न झाल्याने उड्डाण शक्य झाले नाही.
विमानाच्या पायलटने तांत्रिक कारणामुळे टेकऑफसाठी असमर्थता दर्शविल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पी. ए. यांनी दिली, कोणताही धोका पत्करू नये म्हणून गुलाबराव पाटील यांनी रस्ते मार्गाने जळगावकडे प्रस्थान केले.
दरम्यान, अलीकडील विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे विमान सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत