सावदा येथे श्रीमद् शिवमहापुराण कथा – पारायण सोहळ्याचे आयोजन
सावदा येथे श्रीमद् शिवमहापुराण कथा – पारायण सोहळ्याचे आयोजन
लेवाजगत न्युज सावदा :-
श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर, क्रांती चौक, पाटीलपुरा, सावदा यांच्या वतीने देवाधिदेव महादेव श्रीमद् शिवमहापुराण कथा–पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दि. ८ फेब्रुवारी ते दि. १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून दररोज सायंकाळी ६.०० ते १०.०० वा वाजेपर्यंत कथाकथन होणार आहे.
या पवित्र शिवमहापुराण कथेचे कथावाचन स.गु. शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी ( वेदांत–व्याकरणाचार्य ) यांच्या अमृतवाणीने होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास विविध मान्यवरांचे आशीर्वाद लाभणार असून परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सदर सोहळा खोल महादेव मंदिर येथे पार पडणार असून शिवभक्तांसाठी हा एक दुर्मिळ आध्यात्मिक पर्व ठरणार आहे. शिवमहापुराण कथेमधून भक्तांना भगवान शंकराच्या लीला, तत्त्वज्ञान व भक्तीमार्गाचे महत्त्व समजणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील नागरिक, भक्तगण व कार्यकर्ते परिश्रम घेत असून सर्व शिवभक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत