अग्निशमन विभागातील फायरमन आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे तात्काळ भरा नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नांदगाव खंडेश्वर
अग्निशमन विभागातील फायरमन आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे तात्काळ भरा
नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी )
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या अग्निशमन विभागातील फायरमन आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरात आग व इतर आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा देण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये कामकाज सुरळीत चालण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर किंवा थेट भरतीद्वारे पदभरती करणे गरजेचे झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या आस्थापनेवरील फायरमन व इतर पदे रिक्त आहे.
नगर पंचायतीचे क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता नागरी सुविधांवरील ताणही वाढत आहे. विशेषत : आपत्कालीन परिस्थिती आणि आग लागण्याच्या घटनांमध्ये त्वरित प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
परंतु, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, सध्या नगर पंचायतीमध्ये फायरमन (अग्निशामक) आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यामुळे खालील समस्या उद्भवत आहेत.
आग लागल्यास वेळेवर मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. मर्यादित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे.राज्यात अनेक महानगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये रिक्त पदे कंत्राटी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.त्या धर्तीवर आपल्या नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीमध्येही तातडीने फायरमन आणि संबंधित तांत्रिक पदांसाठी त्वरित भरती प्रक्रिया राबवण्यात यावी.
तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून कंत्राटी पद्धतीने अनुभवी ( डिप्लोमा होल्डर ) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.अग्निशमन दलासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून द्यावे.नगर पंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन जनहितासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका प्रभाग क्रमांक १४ नांदगाव खंडेश्वर यांनी मुख्याधिकारी साहेब यांना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत