Contact Banner

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

 

dr-ulhas-patil-krushi-mahavidyalayat-rashtriya-rasta-suraksha-saptah-sajra


डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

लेवाजगत न्यूज | जळगाव

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रस्ता सुरक्षा शपथ घेत ट्रॅफिकचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रस्ता अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक असल्याचे सांगत सर्वांनी जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थी पार्थ पवार व यश पाटील यांनी रस्ता सुरक्षिततेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी यांनी महत्त्वपूर्ण निर्देश देत, हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश न देण्याबाबत निगराणी व पहारेकरी यांना स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रीती दातीर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियमांची माहिती देत त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.