Contact Banner

अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम - डॉ केतकी पाटील

anubhav-gheun-dnyanarjan-kadhihi-uttam-dr-ketaki-patil


अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम - डॉ केतकी पाटील


लेवाजगत न्यूज जळगाव :  मेरा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना, क.ब.चौ.उमवि आंतर जिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठात युवकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ.केतकी पाटील फाऊंडेशच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यात होत आहे. हा कार्यक्रम युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यात प्रा.सुजानी व प्रा.प्रणाली यांच्या नेतृत्वात मुंबई येथील सुमारे ४० युवा सहभागी  झाले.

या वेळी मंचावर डॉ. केतकी पाटील, जिल्हा युवक अधिकारी अभिषेक चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क.ब.चौ. उमवि राष्ट्रीय सेवा योजना चे संचालक डॉ.व्ही.एम.रोकडे उपस्थित होते. कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अभिषेक चौरे यांनी आंतर जिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठात युवकांसाठी कार्यक्रमाचे महत्व विशद केले. तर डॉ. केतकी पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, बहिणाबाई या अशिक्षित होत्या पण जीवनातील अनुभवातून त्यांनी कविता केल्या. अनुभव घेऊन शिकण्यासाठी तुम्ही इकडे आले आहात. ग्रामीण भागात सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती मोठया प्रमाणात साजऱ्या होतात. यानिमित्ताने लोक एकत्र येतात. मेरा युवा भारत अंतर्गत आयोजित या कार्यक्रमामुळे शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्या वैचारिक व सांस्कृतिक आदान प्रदान साठी पूल निर्माण होणार आहे असे सांगिले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क.ब.चौ. उमवि राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. व्ही एम .रोकडे यांनी देखील मार्गदर्शन केले. या प्रसंगी सहभागी युवकांना शूज, ट्रॅकसूट, पाणी बॉटल असलेली किट मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी सहभागी युवकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमांतर्गत हे युवक पाल सह जळगाव जिल्यातील अनेक स्थळांना भेटी देऊन येथील वातावरण, संस्कृती, खाद्य संस्कृती, ऐतिहासिक स्थळे ,ग्रामपंचायत आदींना भेट देऊन माहिती जाणून घेणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.