Contact Banner

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

 

bhirud-parivaratrafey-sant-gajanan-maharaj-pragatdin-utsahat-sajra

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज जळगाव : येथील भिरूड परिवारातर्फे शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील निवासी संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड व सौ. मंजुषा भिरूड, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड व सौ. ज्योत्स्ना भिरूड, लेखापाल योगेश पाटील व सौ. नूतन पाटील, विकास बेंडाळे व सौ. संगीता बेंडाळे, किशोर झांबरे व सौ. किर्ती झांबरे, एन. जी. चौधरी व सौ. स्मिता चौधरी तसेच गोपाळ भोळे व सौ. भोळे या दाम्पत्यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांची महाआरती करण्यात आली.

यावेळी प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, जगन्नाथ भिरूड यांच्यासह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी संत गजानन महाराज यांचे भजन-कीर्तन सादर करण्यात आले. कार्यक्रमानंतर भाविकांना पिठलं-भाकरीचा प्रसाद वितरित करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.