Contact Banner

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

 

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत:
प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

लेवाजगत न्युज जळगाव :
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव (खु.) येथे “डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण” या विषयावर संकरीत पद्धतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.

ही शैक्षणिक कार्यशाळा रेडियोलॉजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता डॉ. केतकी पाटील हॉल, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (खु.) येथे सुरू होणार आहे. या कार्यशाळेत प्रसूतीपूर्व अल्ट्रासाऊंडचे विविध पैलू, सखोल शैक्षणिक सत्रे तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिके (डेमॉन्स्ट्रेशन) घेण्यात येणार आहेत. लोककल्याणकारी दृष्टिकोनातून या कार्यशाळेसाठी २ एमएमसी क्रेडिट पॉइंट्स प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यशाळेतील प्रमुख विषयांमध्ये –
पहिला ट्रायमिस्टर स्कॅन (एनटी व एनबी व्यतिरिक्त), प्रसूती डॉपलरची भूमिका, एएनसीमध्ये मातृत्व मृत्यू प्रतिबंधातील रेडिओलॉजीचे योगदान, एनटी स्कॅन कसे करावे (प्रात्यक्षिक), अ‍ॅनोमली स्कॅन करताना उपयुक्त युक्त्या (प्रात्यक्षिक) तसेच प्रसूती डॉपलर करतानाच्या महत्त्वाच्या टिप्स यांचा समावेश आहे.

या कार्यशाळेत डॉ. रुचिता बागडी, डॉ. किरण पाटील, डॉ. अंजली भिरूड, डॉ. वैशाली चौधरी, डॉ. राजकिरण राठी आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून ३ फेब्रुवारीपासून स्पॉट नोंदणी देखील करता येणार आहे. नोंदणीसाठी पुढील लिंकवर भेट देता येईल :
👉 https://godavarifoundation.com/CPI/cme.html

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. राजकिरण राठी – ७५८८८१०२२२
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी – ९८४८०८६८७४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.