Contact Banner

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम


 जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

लेवाजगत न्यूज जळगाव :
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त चांडक कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात नर्सिंग विद्यार्थ्यांनी रुग्णांना कर्करोगाविषयी सविस्तर माहिती देत लवकर निदानाचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाय तसेच वेळेवर उपचार घेण्याची आवश्यकता याबाबत आरोग्य शिक्षण दिले. रुग्णांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे व सकारात्मक आरोग्यवर्तनास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी डॉ. निलेश चांडकडॉ. सागर व्यास यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगाचे विविध प्रकार, उपचार पद्धती तसेच केमोथेरपीविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे कर्करोग उपचारांबाबतचे क्लिनिकल ज्ञान व व्यावसायिक समज अधिक सुदृढ झाली.

हा जनजागृती कार्यक्रम रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरला. या उपक्रमामुळे समाजात कर्करोगाविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली असून नर्सिंग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक शिक्षणाला मोलाची भर पडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.