Contact Banner

डॉ.अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड गोदावरी फाउंडेशनतर्फे यांचे कौतुक

 

dr-amit-rane-yanchi-japanmadil-pratishthit-wfvs-fellowshipsathi-nivad-godavari-foundation-tarfe-kautuk

डॉ.अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
गोदावरी फाउंडेशनतर्फे यांचे कौतुक

लेवाजगत जळगाव : पुण्यातील प्रसिद्ध रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. अमित राणे यांची जपानमधील टोकियो येथील प्रतिष्ठित मध्ये ‘WFVS’ फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील या महत्त्वाच्या फेलोशिपसाठी निवड होणारे ते मोजक्या तज्ज्ञांपैकी एक ठरले आहेत.

(WFVS) यांच्या वतीने ही फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. जपानमधील नामांकित तज्ज्ञ प्रो. ओकी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राणे रक्तवाहिन्यांशी संबंधित प्रगत शस्त्रक्रिया व आधुनिक उपचार पद्धतींचे प्रशिक्षण घेणार आहेत.

३ ते ६ महिने कालावधीच्या या फेलोशिपसाठी जिकेई युनिव्हर्सिटीच्या रक्तवाहिन्या शस्त्रक्रिया विभागातील डॉ. हिरोत्सुगु ओझावा यांनी त्यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे. या कालावधीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व आंतरराष्ट्रीय मानदंडांचा प्रत्यक्ष अनुभव डॉ. राणे यांना मिळणार आहे.

या फेलोशिपमुळे मिळणाऱ्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा लाभ भविष्यात महाराष्ट्रातील रुग्णांना होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. राणे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या. वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.