सावदा फैजपुर रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; 5 दुकाने जळून खाक, 25 ते 30 लाखांचे नुकसान
सावदा फैजपुर रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; 5 दुकाने जळून खाक, 25 ते 30 लाखांचे नुकसान
लेवाजगत न्युज सावदा : येथील फैजपुर रोडवरील विश्वसुधा हॉस्पिटल जवळ असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अचानक लागलेल्या आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता मोठी असल्याने काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत