भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभाग युवा समिती प्रमुखपदी मयुरेश नरेंद्र कोल्हे यांची नियुक्ती
भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभाग युवा समिती प्रमुखपदी मयुरेश नरेंद्र कोल्हे यांची नियुक्ती
लेवाजगत न्युज मुंबई:- भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया, पाडळसे (ता. यावल, जि. जळगाव) अंतर्गत मुंबई विभागाच्या युवा समितीच्या प्रमुखपदी श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पंचायतच्या मुख्य शाखेच्या कार्यकारिणी बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आली.
नियुक्तीपत्रानुसार श्री. कोल्हे यांनी युवा समिती प्रमुख म्हणून तात्काळ कार्यभार स्वीकारावा, असे नमूद करण्यात आले आहे. पंचायतचे ध्येय व धोरण लक्षात घेऊन लेवा समाजातील युवक-युवतींमध्ये संघटन वाढवणे, समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणे, विवाहपूर्व समुपदेशन, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक तसेच सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवण्याची महत्त्वाची जबाबदारी युवा समितीमार्फत पार पाडली जाणार आहे.
ही नियुक्ती कुटुंबनायक श्री. ललितकुमार रमेश पाटील तसेच अॅड. श्री. संजय मनोहर राणे (सचिव) यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल समाजातील विविध स्तरांतून श्री. मयुरेश कोल्हे यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुंबई विभागातील युवक संघटन अधिक बळकट होईल व समाजकार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत