Contact Banner

जळगावात शिवजयंतीचा जल्लोष; भव्य मिरवणूक व विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग


जळगावात शिवजयंतीचा जल्लोष; भव्य मिरवणूक व विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयासह गोदावरी समूहाच्या विविध संस्थांमध्ये १९ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ८.३० वाजता वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि शिवजयघोषाने परिसर दुमदुमणार असून शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सोहळ्यास माजी खासदार , सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. शिवरायांचे विचार व स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी नमूद केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर गोदावरी नर्सिंग, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी, होमिओपॅथिक, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी, गोदावरी आयएमआर, गोदावरी सीबीएसई, डॉ. वर्षा पाटील टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी तसेच डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय या संस्थांमध्येही विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.