Contact Banner

कै.दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

 

kai-damodar-nana-kshamata-vikas-prabodhini-chya-char-vidyarthyanchi-nivad


कै.दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

लेवाजगत न्यूज, फैजपूर -धनाजी नाना महाविद्यालयातील कै. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिल्लीमार्फत जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत कोळी कुणाल रवींद्र व सोनवणे वैभव विलास यांची सीआयएसएफ कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली आहे. तसेच मेढे रोहित दिवाकर व मराठे चेतन राजू यांची बीएसएफ सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्यामंडळाचे आमदार शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, उपाध्यक्ष मिलिंददादा वाघुळडे, चेअरमन लिलाधर चौधरी, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळडे, उपप्राचार्य डॉ. सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरीश तळेले, प्रबोधिनी समन्वयक डॉ. शरद बिऱ्हाडे तसेच ग्रंथपाल धनश्री प्रमोद बोरोले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.