मधुमेही पाय-गंभीर पण टाळता येणारी समस्या वेळीच काळजी घेतल्यास पाय कापण्याची वेळ टळू शकते : डॉ. सेहर हमदुल्ले
मधुमेही पाय-गंभीर पण टाळता येणारी समस्या
वेळीच काळजी घेतल्यास पाय कापण्याची वेळ टळू शकते : डॉ. सेहर हमदुल्ले
लेवाजगत न्यूज जळगाव — मधुमेह हा दीर्घकाळ चालणारा आजार असून त्यातून उद्भवणार्या गंभीर गुंतागुंतींपैकी एक म्हणजे मधुमेही पाय (डायबेटीक फुट). मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांवर जखमा, फोड, संसर्ग किंवा पाय काळा पडणे (गँग्रीन) अशी लक्षणे दिसून येतात. वेळेवर उपचार न झाल्यास ही समस्या गंभीर स्वरूप धारण करून पाय कापण्याची वेळ देखील येऊ शकते. मात्र योग्य वेळी काळजी आणि उपचार घेतल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, असे मत डॉ. सेहर हमदुल्ले (एम.एस. सर्जरी) यांनी व्यक्त केले.
डॉ. हमदुल्ले यांनी सांगितले की, मधुमेहामध्ये अनेक वर्षे रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यामुळे पायांतील नसांचे नुकसान होते. याला न्युरोपथी असे म्हणतात. त्यामुळे पायाला वेदना, उष्णता किंवा जखम जाणवत नाही. काटा टोचला, चप्पल घासली किंवा फोड पडला तरी रुग्णाला त्याची जाणीव होत नाही.त्याचबरोबर मधुमेहामुळे पायांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. क

कोणत्याही टिप्पण्या नाहीत