Contact Banner

ब्रेकिंग न्यूज: एअर ॲम्बुलन्स दुर्घटना – ७ जणांचा मृत्यू


 ब्रेकिंग न्यूज: एअर ॲम्बुलन्स दुर्घटना – ७ जणांचा मृत्यू  

लेवाजगत न्युज दिल्ली:- 


रांची येथून दिल्लीकडे निघालेलं एअर ॲम्बुलन्स विमान भीषण अपघातग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विमान छतरा जिल्हातील सिमरिया पोलिस स्टेशन हद्दीतील कर्माटंड गावाजवळील जंगलात कोसळले.

या दुर्घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये पेशंट, डॉक्टर, १ पॅरामेडिक, २ अटेंडंट, पायलट आणि को-पायलट यांचा समावेश होता.

सोमवारी संध्याकाळी विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला होता. हे विमान एअर ॲम्बुलन्स असून झारखंडची राजधानी रांचीहून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं.

 अधिकृत तपास सुरू असून अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.