निष्ठा, जबाबदारी आणि कठोर परिश्रम म्हणजेच रुग्णाचे समाधान वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश
निष्ठा, जबाबदारी आणि कठोर परिश्रम म्हणजेच रुग्णाचे समाधान
वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश
लेवाजगत न्यूज जळगाव : निष्ठा, जबाबदारी आणि कठोर परिश्रम म्हणजेच रुग्णाचे खरे समाधान व आनंद होय, असा प्रेरणादायी संदेश गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यात रोल मॉडेलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा ६६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांतर्फे पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व प्राचार्यांच्या उपस्थितीत त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.
सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “गतवर्षी याच दिवशी मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मला मुंबईला जावे लागले होते. त्या आजारपणाच्या काळालाही मी सकारात्मकतेने स्वीकारले. त्यानंतर कठोर परिश्रम आणि सातत्यामुळे आज पुन्हा ठणठणीत उभा आहे. त्यामुळे जीवनात ध्येय निश्चित करून सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. समाजाशी निरंतर संवाद ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.”
“७०० स्क्वेअर फुटांच्या जागेत मी क्लिनिक सुरू केले. आज गोदावरी आईच्या नावाने हा वटवृक्ष उभा आहे. लहानपणी आईने विचारलेले ‘तुझे रोल मॉडेल कोण?’ या प्रश्नाचे उत्तर मी यशवंतराव चव्हाण असे दिले होते. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवल्यानेच ही संस्था उभी राहिली,” असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या काळात आर्थिक साक्षरता महत्त्वाची असल्याचे सांगत, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे मोठे आव्हान ठरणार असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाची पुस्तके वाचण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच प्राचार्य पंकज शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य व गीत सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले. रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी “जाने किस रूप में नारायण मिल जाए” हे गीत सादर केले, तर प्रा. पियूष वाघ यांनी “तो चलूं” हे गीत सादर केले. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत लिखित प्रेमवाणी या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नितू पाटील, डॉ. माया आर्विकर, प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. पंकज बेंडाळे, डॉ. केतकी पाटील स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, गोदावरी नर्सिंगचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, फिजिओथेरपीचे प्रशासन अधिकारी राहुल गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत