सामाजिक कार्यकर्त्या सुनीता म्हात्रे यांचे दुःखद निधन. मनसैनिक विकी म्हात्रे यांना मातृशोक
सामाजिक कार्यकर्त्या सुनीता म्हात्रे यांचे दुःखद निधन. मनसैनिक विकी म्हात्रे यांना मातृशोक
उरण : सुनिल ठाकूर-उलवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असलेल्या उलवे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा सेविका महिला मंडळाच्या अध्यक्षा व समाजसेविका सुनीता चित्तरंजन म्हात्रे
यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर साईनगर स्मशानभूमीत रविवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनसैनिक विकी म्हात्रे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या जाण्याने कुटुंबीय व नातेवाईकांसह संपूर्ण उलवे गावावर शोककळा पसरली आहे. सामाजिक कार्य, सेवाभाव आणि माणुसकीची शिकवण देणारे त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा भावना अंत्यसंस्काराच्या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त करून मनसे उलवे शहराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत