Contact Banner

जळगांव महापालिकेत महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदांवर शिक्कामोर्तब



 जळगांव महापालिकेत महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदांवर शिक्कामोर्तब

लेवाजगत न्यूज जळगाव | प्रतिनिधी

अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपने ४६, शिवसेनेने २२ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १ जागा मिळवली. एका जागेवर अपक्ष तर पाच जागांवर शिवसेना-उबाठा पक्षाने बाजी मारली होती.

मतमोजणीनंतर महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून दीपमाला मनोज काळे यांना महापौर पदासाठी संधी देण्यात आली असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ८ मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली असून त्यांचीही निवड निश्चित झाली आहे.

आज निवडीची नावे जाहीर करताना ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

महापौर व उपमहापौर पदांची अधिकृत घोषणा आज महायुतीकडून करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.