Contact Banner

सावद्यात भक्तिभावाचा महासंगम; दिव्य भव्य शाकोत्सवाचे स्वामीनारायण मंदिरात आयोजन

 

savdyat-bhaktibhavacha-mahasangam-divya-bhavya-shakotsav-swami-narayan-mandirat-ayojan

सावद्यात भक्तिभावाचा महासंगम; दिव्य भव्य शाकोत्सवाचे स्वामीनारायण मंदिरात आयोजन

लेवाजगत न्यूज  सावदा प्रतिनिधी-श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे भक्तिभावपूर्ण वातावरणात दिव्य भव्य शाकोत्सवाचे आयोजन शनिवारी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा सावधान निवासी हरिकृष्ण महाराज राधा कृष्णदेव यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मप्रसादासजी यांच्या मार्गदर्शनाखाली,भक्ती प्रकाशदासजी यांच्या नेतृत्वात मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, धर्म किशोर दासजी,अनंत प्रकाश दासजी, सत्यप्रकाश दासजी या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाची लहर निर्माण झाली असून हरिभक्त व विविध क्षेत्रातील नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता कथामृत व सत्संगाने होणार असून कथा सत्र सकाळी १०.३० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादामध्ये लहान पूर्ण वांग्याची लाल भाजी व बाजरीची भाकर असा पारंपरिक व विशेष मेनू ठेवण्यात आला असून स्वामिनारायण भगवंतांच्या आशीर्वादाने हा प्रसाद दरवर्षी भक्तांना वितरित केला जातो, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या प्रसंगी संतांच्या पवित्र सान्निध्यात धार्मिक विधी, सत्संग व सामूहिक भक्तीभावाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. समाजातील सर्व स्तरांतील भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावदा परिसरातील धार्मिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि सामूहिक सेवाभाव वृद्धिंगत करणारा हा सोहळा ठरणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.