Contact Banner

सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र टिकाराम धांडे यांचे निधन

 

sevanivrutta-shikshak-ramchandra-tikaram-dhande-yanchya-nidhan

 सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र टिकाराम धांडे यांचे निधन

लेवाजगत न्यूज आमोदा- रोझोदा तालुका रावेर येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रामचंद्र टिकाराम धांडे (वय ८२) यांचे गुरुवार दि. १९ रोजी रात्री ९ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धांडे सरांनी अनेक वर्षे प्राथमिक शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांच्या साधेपणामुळे व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीमुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून गेले.

त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते कमलाकर महाजन (भुसावळ) व उमाकांत लोखंडे (पालघर) यांचे सासरे होत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.