सात वर्षांच्या फातिमाचा पहिला रोजा; सावद्यात रमजान महिन्यात भक्तिमय वातावरण
सात वर्षांच्या फातिमाचा पहिला रोजा; सावद्यात रमजान महिन्यात भक्तिमय वातावरण
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :-
सावदा शहरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्वत्र भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. या पवित्र महिन्यात सात वर्षांची चिमुकली फातिमा बी शेख अजीज हिने प्रथमच रोजा (उपवास) ठेवत धार्मिक परंपरेचे पालन केले.
इतक्या लहान वयात पूर्ण दिवसाचा रोजा ठेवून फातिमाने कुटुंबीयांसह समाजातही कौतुकाचा विषय ठरली आहे. तिच्या श्रद्धा, संयम आणि जिद्दीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, फातिमाला लहानपणापासूनच धार्मिक संस्कार दिले जात आहेत. त्यातूनच तिने आनंदाने आणि उत्साहाने रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला.
सावदा शहरात रमजान महिन्यात नमाज अदा करणे, कुरआन पठण आणि सायंकाळी इफ्तारचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. मशिदींमध्ये भाविकांची गर्दी होत असून, एकात्मता आणि बंधुभावाचे दर्शन घडत आहे.
फातिमासारख्या लहान मुलांनी ठेवलेले रोजे समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत