Contact Banner

शतायुषी आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास : सावद्यात अर्जुन चांगो पाटील यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण

 

shatayushi-ayushyacha-preranadayee-pravas-savdyat-arjun-chango-patil-yanchya-shambharavya-varshat-padarpan

शतायुषी आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास : सावद्यात अर्जुन चांगो पाटील यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण

लेवाजगत न्यूज सावदा -रावेर तालुक्यातील सावदा येथिल येथील जगमाता मंदिर परिसरातील रहिवासी आदरणीय अर्जुन चांगो पाटील  यांनी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आयुष्याचा एक प्रेरणादायी टप्पा गाठला. त्यांच्या दीर्घायुष्याच्या निमित्ताने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अर्जुन पाटील यांचे आयुष्य हे अमूल्य ज्ञान, समृद्ध अनुभव आणि जपलेल्या आठवणींचा अनमोल ठेवा मानले जाते. साधेपणा, कष्टाळूपणा आणि संस्कारमूल्यांनी परिपूर्ण असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास आणि समाजाभिमुख विचारांमुळे परिसरात त्यांना विशेष मानाचे स्थान लाभले आहे.

या आनंददायी प्रसंगी पाटील परिवारातर्फे तसेच आप्तेष्टांनी त्यांना शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देत पुढील आयुष्य निरोगी, आनंददायी आणि समाधानाने परिपूर्ण जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली. त्यांच्या आशीर्वादाचा लाभ पुढील पिढ्यांना सतत मिळत राहावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शतायुषी आयुष्याचा हा टप्पा गाठताना अर्जुन पाटील यांनी जपलेली जीवनमूल्ये, सकारात्मक दृष्टिकोन आणि संयमी जीवनशैली ही समाजासाठी मार्गदर्शक ठरत असून त्यांच्या दीर्घायुष्याचा उत्सव हा संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.