Contact Banner

श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

shri-a-g-hy-school-ani-shri-na-go-patil-junior-college-savda-paritoshik-vitaran-samarambh-utsahat



श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

लेवाजगत न्यूज सावदा :- दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील या होत्या. उद्घाटक म्हणून शिक्षण समिती सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे उपस्थित होते, तर पारितोषिक वितरक म्हणून सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी भूमिका बजावली.

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष फिरोज खाँ हबीबुल्ला खाँ पठाण, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र राजेश गजाननराव वानखेडे, सौ. रेखा राजेश वानखेडे, सौ. रंजना जितेंद्र भारंबे, सौ. जयश्री अतुल नेहते, सौ. सीमा वेडू लोखंडे, सौ. सुनीता संजय तायडे, सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे, कु. सिमरन राजेश वानखेडे, हेमंत रूपा महाजन, नकुल नितीन बेंडाळे, सुनील नेमीचंद जंगले यांच्यासह पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष सुपडू तेली, श्रीकांत किशोर वाणी, मधुकर मेढे व इतर पालक-शिक्षक संघ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पीएम श्री नानासाहेब विष्णुरी पाटील विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका पुष्पलता प्रवीण ठोंबरे यांचीही उपस्थिती लाभली.

उद्घाटक सचिन बऱ्हाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्राचार्य पी. जी. भालेराव, पर्यवेक्षक संजय मोतीराम महाजन, उपशिक्षिका कल्पना शिरसाट व संध्या चौधरी यांनी पाहुण्यांचा संविधान पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

प्रास्ताविक प्राचार्य भालेराव यांनी केले, तर वार्षिक अहवाल वाचन संजय महाजन यांनी केले. यानंतर विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. तरुण उद्योजक मनोज वसंतराव पाटील, सौ. प्रतीक्षा भंगाळे, कु. सिमरन वानखेडे आणि पारितोषिक वितरक विशाल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यास सुरुवात झाली. इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांक पटकावणारा तनेश अशोक चौधरी याला सर्वाधिक पारितोषिके मिळाली, तर इयत्ता बारावीतील प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी अनुष्का रमाकांत कोष्टी हिलाही गौरविण्यात आले. वर्षभरात निबंध, वक्तृत्व, रांगोळी, हस्ताक्षर तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य भालेराव होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षक व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याने वातावरण भावनिक झाले. यावेळी मनोज महाजन, संजय महाजन व प्राचार्य भालेराव यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स यांनी मोलाचे सहकार्य केले. दानशूर व्यक्ती व नगरसेवकांचे आभार प्राचार्य भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रणाली काटे यांनी केले, तर सूत्रसंचालन कलाशिक्षक नंदकिशोर पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.