Contact Banner

फैजपूर येथे यावल रोड लक्ष्मी नगर–वृंदावन कॉलनीत पाणीपुरवठा खंडित; पाईपलाईन दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना

 

yaval-road-laxmi-nagar-vrundavan-colony-pani-puravatha-khandit-pipeline-durustisathi-tatkhal-upayayojana

यावल रोड लक्ष्मी नगर–वृंदावन कॉलनीत पाणीपुरवठा खंडित; पाईपलाईन दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना

लेवाजगत न्यूज फैजपूर -यावल रोड परिसरातील लक्ष्मी नगर व वृंदावन कॉलनी येथे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने शनिवारी नागरिकांना पाणीपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागला. या भागातील पाण्याची पाईपलाईन कुठेतरी चोकअप झाल्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनसह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी भाजपा नगरसेवक तथा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, हेमराज चौधरी, अनंत नेहेते, संदीप (गोटू) भारंबे, राजेश महाजन, चंदू कोळी, राकेश सराफ तसेच परिसरातील रहिवासी नागरिक उपस्थित राहून कामाची पाहणी केली.

नगरपालिकेकडून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले असून नागरिकांनीही संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.