युवा शिक्षक अमित चौधरी यांची जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड
युवा शिक्षक अमित चौधरी यांची जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड
लेवाजगत न्यूज भुसावळ -जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ शहरातील हिंदी सेवा मंडळ संचालित श्री.र .नं. नेता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ शाळेचे उपशिक्षक श्री अमित विजय चौधरी आणि श्री स्वप्निल वसंतराव पाटील
उपशिक्षक साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालय झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. खाजगी शाळा कर्मचारी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रसन्ना बोरोले,सलीम तडवी, गोविंदा लोखंडे,आशिष पवार,संतोष मराठे,संचालक प्रशांत साखरे, सुनील पवार रूपाली पाटील ,गणेश लोडते ,प्रफुल्ल सरोदे,वना महाजन,राकेश पाटील ,अविनाश घुगे ,धनंजय काकडे, तज्ञ संचालक महेंद्र रामोसे, मोहन पालवे उपस्थित होते. जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक- शिक्षकेतर सोसायटी तसेच संघटना आणि शिक्षक- शिक्षकेतर परिवार यांचे कडून अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत