Contact Banner

प्रत्येक भारतीय देशासाठी समर्पित सैनिकच - कर्नल उत्तम पाटील

 

pratyek-bhartiya-deshsathi-samarpit-sainikach-karnal-uttam-patil


प्रत्येक भारतीय देशासाठी समर्पित सैनिकच - कर्नल उत्तम पाटील


लेवाजगत न्यूज फैजपूर -भारताची सशस्त्र सेना संपूर्ण विश्वात अनुभवी, सक्षम, सामर्थ्यवान व अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून भूदल, नौसेना व वायुसेना यांच्यासहितच प्रत्येक भारतीय जो सामान्य शेतकरी, तंत्रज्ञ, डॉक्टर, वकील, अभियंता आहे तोही देशाचा सैनिकच आहे ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पितपणे काम करावे. राष्ट्रीय छात्र सेना देशासाठी अशाच समर्पित युवकांची फौज तयार करत असून एन सी सी कॅडेट्सने आयुष्यात मोठे ध्येय बाळगून देश व समाज सेवा करावी असे आवाहन कर्नल उत्तम पाटील यांनी केले.

 ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना व नोबेल फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *भारतीय सैन्य दलातील करिअरच्या विविध संधी* या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

 याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा गणित विभाग प्रमुख प्रा डॉ हरीश गणेश नेमाडे, सुभेदार मेजर सुरेश कुमार, एक्स आर्मी मॅन व सध्यस्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र, सावदा येथे कॅशियर म्हणून कार्यरत श्री कृष्णकांत गावंडे, प्रा डॉ गोविंदराव मारतळे, प्रा डॉ जगदीश खरात, इंग्रजी विभाग प्रमुख तथा एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासहित एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील एक्स एन सी सी कॅडेट चेतन मराठे याची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ( बीएसएफ ) मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी कर्नल उत्तम पाटील यांनी स्वतःचा जीवन प्रवास, एनडीए, आयएमए व सैनिक स्कूल, सातारा येथील अनुभव, सैन्य दलातील ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन कारगिल येथील चित्तथरारक अनुभव सांगत कॅडेट्सना प्रेरित केले. शारीरिक कसरती सोबतच योगा व ध्यान या माध्यमातून बौद्धिक, भावनिक व आत्मिक बळावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन करून ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीष दादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.