Contact Banner

अखिल भारतीय आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक


akhil-bharatiya-antarvidyapeeth-taekwondo-spardhet-godavari-abhiyantriki-kasya-padak


अखिल भारतीय आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक 

लेवाजगत न्यूज जळगाव — गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागातील पूर्वा नारायण चौधरी हिने अखिल भारतीय विद्यापीठस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कास्य पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

पूर्वा हिची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या तायक्वांदो संघात झाली होती. ओडिशा राज्यातील फकीर मोहन विद्यापीठ येथे दि. १६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत देशभरातील नामांकित विद्यापीठांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत ५२ किलो वजन गटात खेळताना पूर्वा हिने अत्यंत दमदार व आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. तिने सलग ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत तिने महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी येथील खेळाडूला दुसर्‍या फेरीत २२-११ अशा गुणांनी पराभूत करत ब्रॉन्झ पदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पूर्वा हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल  गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट),डॉ. अनिकेत पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, संबंधित विभागप्रमुख तसेच शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.