Contact Banner

अवैध वाळू वाहतुकीत जप्त ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी जाहीर लिलाव


avaidh-valu-vahatukit-japt-34-vahanancha-12-march-roji-jahir-lilav


अवैध वाळू वाहतुकीत जप्त ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी जाहीर लिलाव

जळगाव, दि. ५ (लेवाजगत न्यूज) : जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत आवार, आकाशवाणी चौक, जळगाव येथे ठेवण्यात आलेल्या वाहनांपैकी दंडाची रक्कम न भरलेल्या वाहनमालकांची एकूण ३४ वाहने लिलावासाठी ठेवण्यात आली आहेत.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे जाहीर बोली पद्धतीने करण्यात येणार आहे.

लिलावासाठी असलेल्या वाहनांची सविस्तर माहिती, हातची किंमत, दंडाची रक्कम तसेच लिलावाच्या सर्व अटी व शर्ती तहसील कार्यालय, जळगाव येथील नोटीस बोर्डावर तसेच www.jalgaon.nic.inwww.jalgaon.nic.in⁠ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, जळगाव येथे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.

दरम्यान, लिलावात समाविष्ट नसलेली तसेच प्रशासकीय इमारत आवार किंवा इतर ठिकाणी जप्त असलेली आणि क्रमांक किंवा चेसीस नंबरमध्ये तफावत असलेली वाहने भंगारमध्ये देऊन त्यातून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहितीही तहसीलदार शितल राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.