भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर
भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर
लेवाजगत न्यूज भुसावळ — आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ,श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जि नाशिक,श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र भुसावळ आणि डॉ.उलहास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने भुसावळात दि २० रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमीत्त नंदनवन कॉलनीतील खाचणे हॉल भुसावळ येथे सकाळी ९ ते ५ यावेळेत हे शिबिर श्री स्वामी समर्थ केंद्र भुसावळ तर्फे आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात डॉ.उलहास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी जळगावचे तज्ञ सहकार्य करणार असून जास्तीत जास्त सेवेकरींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुरेश न्हावकर ९४२३९५०९२४ आणि लक्ष्मण पाटील ९३२६१५०००६ यांचेशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत