Contact Banner

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचा स्तुत्य उपक्रम


maharashtra-leva-patidar-mahasanghacha-stutya-upakram


महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचा स्तुत्य उपक्रम

लेवाजगत न्यूज जळगाव : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे नुकताच येथे विवाह, घटस्फोट व पुनर्विवाह या विषयांवरील कौटुंबिक समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधून महासंघाचे प्रशिक्षक व समुपदेशक सहभागी झाले होते. एकूण सुमारे 90 पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती लाभली. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात अनुभवी प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अनुभव कथन, केस स्टडी तसेच चर्चासत्रांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान समाजासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या जळगाव येथील कु. नंदिनी पाटील (आय.ए.एस.) यांचा त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत पुणेरी पगडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी समाजातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली.

तसेच महासंघाचे सचिव दिलीप नाफडे यांचे सुपुत्र अमित नाफडे यांची जगभरातील केवळ 30 जणांमधून निवड होऊन त्यांना "Acumen Angels Award" जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. त्यांचा सत्कार दिलीप नाफडे यांनी स्वीकारला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकृष्ण लॉन्सच्या संचालिका जयश्रीताई चौधरी-पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी सामाजिक कार्यासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अरुणदादा बोरोले यांनी केले. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला संयोजिका (खान्देश विभाग) पुष्पा पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.