Contact Banner

डॅडी चषक चा मानकरी ठरला अंबापाडा माहूल संघा चा अद्वित इलेव्हन

daddy-chashak-cha-mankari-tharla-ambapada-mahul-sanghacha-advit-eleven


 डॅडी चषक चा मानकरी ठरला  अंबापाडा माहूल संघा चा अद्वित इलेव्हन 


लेवाजगत न्यूज उरण :सुनिल ठाकूर -जे .ऐन.पी.टी. च्या मैदानावर सळग चार दिवस चालणारे मोरेशवर विठटल ठाकूर चषक स्पर्धेचे उद्घाटन गणेशाचया पुजनाने व मोरेशवर ठाकूर यांच्या प्रतिमेस  पुष्प हार व दीप प्रज्वलित करून करण्यात आली.

   दीप प्रज्वलन व पुष्पहार सन्मानिय चंद्रकांत घरत (बी.जे. पी .उपाध्यक्ष रायगड जिल्हा ),दीपक ठाकूर (शिंदेसेना तालुका प्रमुख उरण),प्रदीप ठाकूर शिवसेना उप तालुका प्रमुख.यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिश पाटील व सामन्यांचे समालोचन अमित म्हात्रे यांनी केले.खेळपट्टी चे उद्घाटन चंद्रकांत घरत ,दीपक ठाकूर व प्रदीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.राष्ट्रगीता नंतर सामना सुरू झाला. नाणेफेक जिंकत केळवणे संघ व पाणजे संघ यांच्यात सामना खेळला गेला.

  स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आयोजक भागेश ठाकूर,संदेश ठाकूर(सॅंडी ),कुणाल घरत,प्रथमेश म्हात्रे ,भुपेंदर ठाकूर,तेजस म्हात्रे ,पिटया ,वैभव पाटील,महेंद्र शेलार,विराज वाजेकर व आयर्न पाटील यांनी मेहनत घेतली. अनेक मान्यवर व जे. ऐन. पी. अे.चे   ट्रस्टी रवी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 

पहिल्या सेमी फायनल-मॅन अॅाफ दि मॅच -सचीन काटकर (माहूल मुंबई संघ) भव्य चषक व सायकल .

दुसरी सेमी फायनल- मॅन ऑफ दी मॅच विकी म्हात्रे,भव्य चषक व सायकल 

बेस्ट बॅालर -अक्षय दाभोलकर  बक्षीस सायकल 

बेस्ट फील्डर - हीतेन भोईर भेंडखळ संघ सायकल

मॅन अॅाफ दी मॅच - भैरवनाथ संघ धुतुम चा प्रणित ठाकूर भव्य चषक व सायकल 

फायनल मॅच -मॅन ऑफ दी मॅच व मॅन ऑफ दी शिरीज .विजेता ठरला अंबापाडा माहूल संघ मुंबई चा सचिन काटकर  बक्षीस भव्य चषक आणि बाईक.

सदर सामन्यांचे उत्कृष्ट गुण लेखन दीपेश कडू यांनी केले,उत्तम मंडप डेकोरेशन देवेंद्र तांडेल व सामन्यात उत्कृष्ट संगीत मेजवानी डी.जे.राम यांनी, यु ट्यूब चॅनेल लाईव्ह २४ लाईव्ह इव्हेंट यानी केले तसेच मैदानावर निगडित व्यवस्था संजय पाटील यांनी पाहिली.

तुतारी वाजवत व डी.जे.च्या तालावर नाचत गाजत उत्साहात चार दिवस चाललेल्या सामन्यांची समाप्ती झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.