Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

 

dhanaji-nana-mahavidyalayat-vanijya-prashnamanjusha-spardha-bakshis-vitaran-sohala-utsahat

धनाजी नाना महाविद्यालयात वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

फैजपूर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील वाणिज्य विभागातर्फे आयोजित वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत वाणिज्य विभागातील एकूण ६४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते. यावेळी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. रवी एन. केसुर तसेच विभागातील प्राध्यापक डॉ. आरती भिडे, डॉ. विवेक श्रावगे, प्रा. आकाश तायडे आणि प्रा. यश भारंबे उपस्थित होते.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. अश्विनी वानखेडे आणि शेख सोहिल शेख रईस यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कु. मृणाल महाजन यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर शेख परवेज मुश्ताक आणि शेख काफिल शेख मोमीन यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे आणि वित्तीय ज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेबाबत आपले मनोगत व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आरती भिडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी केसुर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विवेक श्रावगे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.