Contact Banner

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे ‘कृषीविश्व २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


dr-ulhas-patil-krushi-mahavidyalay-jalgaon-krushivishva-2026-snehasammelan-utsahat-sampann


डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे ‘कृषीविश्व २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज भुसावळ-डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित ‘कृषीविश्व २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा, उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उ. पा. कृ. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव चे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे, डॉ. ए. पी. चौधरी (शिक्षण व संशोधन संचालक, कृषी शिक्षण संकुल, गोदावरी फाऊंडेशन), श्री. मोहन सूर्यवंशी (प्रशासकीय अधिकारी), उपप्राचार्य प्रा. पी. एस. देवरे, तसेच स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. एस. एन. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विविध स्पर्धांनी रंगत

पहिल्या दिवशी मंडला आर्ट, पोस्टर मेकिंग, ‘वन मिनिट टास्क’ यांसारख्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

‘वन मिनिट टास्क’मध्ये महेश पाटील व दिशा वाघ विजेते ठरले. मंडला आर्ट व पोस्टर स्पर्धेत कृष्णराज सोनवणे (प्रथम), नेत्रा खराटे (द्वितीय) व दिशा वाघ (तृतीय) यांनी यश संपादन केले.

दुसऱ्या दिवशी ग्रुप डे, ट्विन डे, रांगोळी, म्युझिकल चेअर व दोरखेच (Tug of War) स्पर्धा घेण्यात आल्या. म्युझिकल चेअरमध्ये आरती वालवी, भावना दलाल व राज कुरे यांनी उल्लेखनीय यश मिळवले. रांगोळी स्पर्धेत दिशा वाघ (प्रथम), यश पवार समूह (द्वितीय) व प्रियांका गावित (तृतीय) ठरल्या.

तिसऱ्या दिवशी ‘बॉलिवूड डे’ व ‘फिश पाँड’ कार्यक्रम रंगला. रॅम्प वॉकमध्ये श्रुस्ती डोंगरे (प्रथम) व पूर्वजा कुमावत (द्वितीय) यांनी आपली छाप पाडली.

चौथ्या दिवशी नृत्य, नाटिका, माइम, गीत गायन व मिमिक्री स्पर्धा पार पडल्या. एकल नृत्यात श्रुस्ती डोंगरे (प्रथम) व साक्षी बहेकर (द्वितीय) विजेते ठरले. समूह नृत्यात युगल धाके समूह विजेता, हिटर्स समूह उपविजेता तर नेहा बाविस्कर व माधुरी सोनवणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. माइममध्ये 7/12 समूह प्रथम, नाटिकेत तृतीय वर्ष विद्यार्थी विजेते ठरले. मिमिक्रीमध्ये अमोड अख्तर (प्रथम) व नीरज सोनवणे (द्वितीय) तर गीत गायनात धीरज खेडकर (प्रथम) व उदय माळी (उपविजेता) ठरले.

समारोप सोहळा

समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय बाविस्कर (मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. ए. पी. चौधरी तसेच उपप्राचार्य प्रा. पी. एस. देवरे उपस्थित होते. विजेत्यांना चषक, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

डॉ. विजय बाविस्कर यांनी कृषी क्षेत्रातील संधी व विद्यार्थ्यांची भूमिका अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेश तायडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला.

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. एन. पाटील यांच्यासह प्रा. करन बन्सोडे, प्रा. एन. बी. सदार, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. कार्तिक खर्चे, प्रा. सागर ठाकरे, प्रा. केशव पराशर, डॉ. प्रीती दातीर, प्रा. प्रियल राठी, प्रा. सायली विधाते, डॉ. एम. एस. भावसार आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले.

समारोपाच्या दिवशी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. डीजे नाईटने स्नेहसंमेलनाचा उत्साह शिगेला पोहोचला. आनंद, उत्साह व एकोप्याच्या वातावरणात ‘कृषीविश्व २०२६’ सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.