Contact Banner

डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये विद्यार्थिनींच्या स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

 

dr-varsha-patil-womens-college-home-science-vidyarthininchya-svanirmit-vastunche-pradarshan-va-vikri
               (वरील इमेज AI निर्मित चित्र आहे )

डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये विद्यार्थिनींच्या स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

जळगाव – डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात दिनांक १२ व १३ मार्च रोजी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या कला, कौशल्य व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी तयार केलेल्या बांधणी साड्या, दुपट्टे, पर्स, बॅग, स्केचिंग केलेल्या बॅग, विविध प्रकारचे वन पीस ड्रेस, घागरे, पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी, नेल आर्ट, सौंदर्य प्रसाधने, मायक्रोम वस्तू, आरीवर्क ब्लाऊज, एम्ब्रॉयडरी रुमाल, ग्रीटिंग्स, फोटो फ्रेम, रंगोली साहित्य, ज्वेलरी व हाताने बनवलेल्या ज्वेलरी किट यांसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व मुखवास विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व डॉ. प्रशांत वारके उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीनल राणे, कविता भोरटक्के, जयश्री कुलकर्णी, हिमानी जमाले व शुभांगी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या प्रदर्शनाला विद्यार्थिनी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.