Contact Banner

अपघातात जखमी तरुण कुशल सुरेश इंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

 

apghatat-jakhmi-tarun-kushal-suresh-ingle-yanchya-upcharadarmyan-mrityu

अपघातात जखमी तरुण कुशल सुरेश इंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

लेवाजगत न्यूज | खिरोदा : येथील धनाजी नाना विद्यालयासमोरील कलानगर परिसरातील रहिवासी कुशल सुरेश इंगळे (वय १९) यांचे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता उपचारादरम्यान निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी किनगावजवळ झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी  5 वाजता खिरोदा येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक सुरेश गंगाधर इंगळे यांचे सुपुत्र तर वैभव सुरेश इंगळे यांचे भाऊ होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.