गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात “DIPEX Talk 2K26” उत्साहात संपन्न
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात “DIPEX Talk 2K26” उत्साहात संपन्न
लेवाजगत न्यूज जळगाव :-गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव (स्वायत्त व NAAC मानांकित) येथे “DIPEX Talk 2K26” या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दि. 30 मार्च 2026 रोजी करण्यात आले. अनुशासित व प्रगतशील विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वरुणराज नन्नवरे (ABVP देवगिरी प्रांत प्रदेश मंत्री) उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संघटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघभावना विकसित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. कल्याण दाणी (डायरेक्टर, राम अँटीव्हायरस प्रा. लि.) होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञानातील बदलते ट्रेंड आणि आधुनिक करिअरच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढत असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय, जळगाव यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपल्या कौशल्यांचा विकास करावा, असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. हेमंत इंगळे (डीन इनोव्हेशन), प्रा. दीपक झांबरे (डिप्लोमा कोऑर्डिनेटर), प्रा. नितीन पाटील (डीन अकॅडेमिक), प्रा. अमिता महाजन (विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी), प्रा. नीलिमा पाटील (विभाग प्रमुख एआय अँड एमएल), प्रा. प्रसाद मराठे (विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी), प्रा. राजश्री खडके (विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), प्रा. लीना चौधरी, प्रा. रोहिणी डवले तसेच प्रा. दीपेश भुसे (विभाग प्रमुख बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज) यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद प्रतिनिधी प्रणव कंवर, यश बोंडे, मोहित चौधरी व रोहित कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा सोनवणे यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत