Contact Banner

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

godavari-vyavasthapan-mahavidyalayat-paryavaranpurak-holi-sajri


गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

लेवाजगत न्यूज जळगाव - होळी सणाचे औचित्य साधत जळगाव येथील गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांची सुकलेली पाने गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर या सुकलेल्या पानांची होळी प्रज्वलित करून पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते होळीचे पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वारके म्हणाले की, आपण पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करत असलो तरी पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. महर्षी कर्वे व संत गाडगेबाबा यांनी नेहमीच परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला आहे. परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई पसरत नाही. तसेच युवा पिढीने सोशल मीडियापासून काही काळ दूर राहून सण-उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कोरड्या रंगांचा वापर करून होळी खेळली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडी होळी खेळण्याचे आवाहनही करण्यात आले. पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे केल्यास निसर्गाचे नुकसान टाळता येते आणि आरोग्यालाही धोका कमी होतो, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.