Contact Banner

जागतिक महिला दिनानिमित्त २७ महिलांचा सन्मान


jagatik-mahila-din-nimit-27-mahilanchya-sanman


जागतिक महिला दिनानिमित्त २७ महिलांचा सन्मान


 लेवाजगत न्यूज जळगाव प्रतिनिधी :-आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन / दिशा स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज विद्यालय, मेहरून येथे महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ महिलांचा फुलगुच्छ, ट्रॉफी व सन्मानचिन्ह (फ्रेम) देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजसेवा व आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सहा परिचारिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रा. रफिक शेख, माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन, नगरसेविका जयश्रीताई पाटील, डॉ. संदीप पाटील, निलेश बनसोडे, हेमंत दाभाडे, सौ. अर्चनाताई माळी, भारती काळे, संदीप राणे व राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व सचिव हर्षाली पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बडगुजर यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या कार्याचा गौरव केला व समाजातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.