Contact Banner

जळगावातच तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर ३, ४ व ५ एप्रिलला जळगावात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, फक्त १०० रुग्णांसाठी संधी

jalgaonat-tiralepana-shastrakriyeche-mofat-mega-shibir-3-4-5-april-dr-madhusudan-zanwar-100-rugna-sandhi


 जळगावातच तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

३, ४ व ५ एप्रिलला जळगावात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, फक्त १०० रुग्णांसाठी संधी

लेवाजगत न्यूज जळगाव : तिरळेपणा या डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे दि. ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी तिरळेपणा व पडलेली पापणी यासाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी पुण्याचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.मधुसूदन झंवर  उपस्थित राहणार आहेत. त्यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी त्यांनी १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. तिरळेपणा तसेच पडलेल्या पापणीच्या रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जातील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.