कंत्राटी कामगारावर भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञात ईसमाला कठोर शिक्षा, झालीच पाहिजे! या बाबत उरण तहसीलदार यांना निवेदन
कंत्राटी कामगारावर भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञात ईसमाला कठोर शिक्षा,
झालीच पाहिजे! या बाबत उरण तहसीलदार यांना निवेदन
उरण : सुनिल ठाकूर -उल्हासनगर महापालिकेमधील कंत्राटी सफाई कामगार श्री महादू जगताप यांच्यावर एका अज्ञात इसमाने दिवसा ढवळ्या धारधार हत्याराने भ्याड हल्ला करून खून केला आहे.
दि. ११ मार्च २०२६ रोजी राज्यात सर्वत्र संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील मुख्याधिकारी आणि तालुका तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
कंत्राटी सफाई कामगार श्री महाद जगताप हे स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकून - जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणारा एक गरीब सेवक होता. त्यांचा खून झाला म्हणून केवळ श्रद्धांजली वाहून चालणार नाही.
उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ऊन , वारा - पाऊस, थंडी, विविध नैसर्गिक व मनूष्य निर्मित दुर्घटना होतात त्यामध्ये रक्ताचे पाणी करून काम करणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोवीड सारख्या जागतीक महामारी आली तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेचे जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या महादू जगताप या गरीब बांधवांला खरोखर फक्त भावपूर्ण श्रद्धांजली! वाहून चालणार नाही. तर १) त्या अज्ञात हल्लेखोराला पोलीस यंत्रणेने पकडून , मा. न्याय व्यवस्थेने त्या खुन्याला कठोरात कठोर शिक्षा करावी. २) आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उल्हासनगर महापालिकेमधील गरीब कंत्राटी सफाई कामगार त्यांच्या कुटूंबाचा एकमेव आधार महादू जगताप यांच्या कुटुंबातील सदस्यांना योग्य आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्यात यावे. ३) या दुर्घटनेप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून सरकारी कर्मचार्यांना जबर मारहाण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे ही वस्तुस्थिती आहे. तरी या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता राज्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचे , अधिकार्यांचे मनोधैर्य उत्तम दर्जेदार काम देण्यासाठी वाढावे या संपूर्ण परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करून सरकारी काम करणार्या कर्मचार्यांना पूर्णत: संरक्षण मिळेल आणि गुन्हेगारांना दहशत बसेल अशा प्रकारे कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी ही मागणी आज मा. श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना राज्यातील, विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील मुख्याधिकारी तसेच तहसिलदार यांच्या मार्फत बहुसंख्य कामगारांनी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. डि. एल. कराड, ॲड सुरेश ठाकूर, श्री रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, मुख्य संघटक श्री संतोष पवार, ॲड. सुनील वाळूंजकर, समन्वयक अनिल जाधव, अनिल पवार, श्री. अन्ना पाटील , श्री. रमेश कदम, श्री भिवाजी वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत