खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षकांची थकीत बिले उपसंचालक कार्यालयाकडून सरसकट रिजेक्ट; शिक्षकांमध्ये संभ्रम
खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षकांची थकीत बिले उपसंचालक कार्यालयाकडून सरसकट रिजेक्ट; शिक्षकांमध्ये संभ्रम
नाशिक : उपसंचालक कार्यालय, नाशिक विभाग (DYD) यांनी खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षकांच्या थकीत बिलांबाबत पाठविण्यात आलेली सर्व बिले सरसकट रिजेक्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खाजगी अनुदानित शिक्षकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत वेतन अधीक्षक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संबंधित थकीत बिलांची सर्व त्रुटी तपासून व दूर करून ती विहित वेळेत उपसंचालक कार्यालयाकडे पाठविली होती. मात्र कोणतीही स्पष्ट त्रुटी नमूद न करता उपसंचालक कार्यालयाने सर्व बिले एकत्रितपणे रिजेक्ट केल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर अनेक मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये काही प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र घाबरून न जाता शासनाने दिलेल्या सूचनांनुसार पुन्हा एकदा बिले विहित नमुन्यात तयार करून फॉरवर्ड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच वेतन अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व संबंधितांनी आपल्या बिलांची हार्ड कॉपी वेतन पथक विभाग, जळगाव येथे जमा करावी. काही शंका असल्यास संबंधितांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधून शंका निरसन करून घ्यावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेबाबत शासनाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे समोर येत आहे. दरवर्षी मार्च अखेर उपसंचालक कार्यालयाकडून प्रक्रिया उशिरा पूर्ण होत असल्याने अनेक शिक्षक थकीत वेतनापासून वंचित राहतात. या गंभीर बाबीकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत