Contact Banner

पीएनजी ज्वेलर्सचा नवी मुंबईत विस्तार माधुरी दीक्षितच्या हस्ते उरणमध्ये नव्या स्टोअरचे उद्घाटन

 

png-jewellers-navi-mumbai-vistar-madhuri-dixit-haste-uran-nave-store-udghatan


पीएनजी ज्वेलर्सचा नवी मुंबईत विस्तार माधुरी दीक्षितच्या हस्ते उरणमध्ये नव्या स्टोअरचे उद्घाटन


उरण:सुनिल ठाकूर -भारतातील आघाडीचा राष्ट्रीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने नवी मुंबईतील उरण येथे आपले नवीन भव्य शोरूम सुरू केले आहे. महाराष्ट्रात आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार करत ब्रँडने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, या नव्या दालनासह देशभरातील पीएनजी ज्वेलर्सच्या एकूण रिटेल स्टोअर्सची संख्या आता ७० वर पोहोचली आहे. तब्बल ४५०० स्क्वेअर फूट विस्तीर्ण असलेल्या या नव्या स्टोअरचे उद्घाटन १३ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईच्या ग्रँड उरण सेंट्रल येथे प्रसिद्ध अभिनेत्री आणि ब्रँड ॲम्बेसेडर माधुरी दीक्षित यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले.


याप्रसंगी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले की, उरण आणि परिसरातील ग्राहकांकडून बऱ्याच काळापासून दालन सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. हा विस्तार वाढती मागणी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने करण्यात आला असून, या नव्या शोरूमच्या माध्यमातून विश्वास, उत्कृष्ट कलाकुसर आणि पारदर्शक व्यावसायिक परंपरा ग्राहकांच्या अधिक जवळ आणायची आहे. तसेच ग्राहकांना आमच्या सेवा आणि दालनांचा सोयीस्कर अनुभव प्रदान करायचा आहे. तर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी पीएनजी ज्वेलर्सला उरणमधील नव्या दालनाच्या शुभारंभावर शुभेच्छा दिल्या आणि दोन शतकांची विश्वासाची व उत्कृष्ट कलाकुसरीची समृद्ध परंपरा आता उरणकरांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या नव्या दालनासह पीएनजी ज्वेलर्स आपले रिटेल नेटवर्क अधिक मजबूत करत असून, जवळपास दोन शतके जुना गुणवत्ता आणि विश्वासाचा वारसा नव्या बाजारपेठेत पोहोचवत आहे.


या नव्या स्टोअरच्या उद्घाटनानिमित्त पीएनजी ज्वेलर्सने ग्राहकांसाठी विशेष सवलतींची घोषणा केली आहे. ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) फ्लॅट ३०% आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट १००% सूट मिळणार आहे. या आकर्षक ऑफर्सचा लाभ ग्राहकांना १३ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत घेता येईल. उरण येथील या दालनात 'प्रथा', 'कथा', 'पोलमी', 'इना', 'सप्तम' आणि 'आशीर्वाद' यांसारखी पीएनजीची सिग्नेचर कलेक्शन्स उपलब्ध असतील, ज्यामध्ये पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक डिझाइन्सचा अप्रतिम मिलाफ पाहायला मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.