महिला दिनानिमित्त कल्याणमध्ये लेवा पाटीदार समाजाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम
महिला दिनानिमित्त कल्याणमध्ये लेवा पाटीदार समाजाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम
लेवाजगत न्यूज कल्याण (प्रतिनिधी):-
लेवा पाटीदार समाज मंडळ, कल्याण आणि युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, कल्याण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी गणेश विद्या मंदिर, गणेशवाडी, कोळसेवाडी, कल्याण (पूर्व) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम परिसरातील लेवा समाजातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, बास्केटबॉल, चमचा-लिंबू, नृत्य, नाटक आणि गायन अशा विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भाग्यश्रीताई पाचपांडे (सचिव, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत मुंबई विभाग), श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे (युवा समिती प्रमुख, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत मुंबई विभाग), सौ. गायत्री ताई चौधरी, श्री. तुषार चौधरी, युवराज सर, विनय धांडे, सागर बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मोनाली राणे, सौ. गायत्री ताई चौधरी, सौ. रुपाली कोलते, प्रणली बेंडाळे, शीला नेमाडे तसेच लेवा नारीशक्ती महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉद्वारे एका भाग्यवान महिलेला स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात आले. तसेच विविध खेळ व स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम महिलांच्या एकतेचा, उत्साहाचा आणि सशक्तीकरणाचा सुंदर उत्सव ठरला. लेवा पाटीदार समाज मंडळ, कल्याण आणि युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, कल्याण शहर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत