महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू
लेवाजगत न्यूज जळगाव : शहरातील महिलांच्या आरोग्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटल येथे आता नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील स्वतः 'गायनॅकॉलॉजी ओपीडीमध्ये सेवा देणार आहेत. महिलांचे विविध आरोग्य समस्यांवर एकाच छताखाली तज्ज्ञ सल्ला आणि उपचार उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उपलब्ध उपचार आणि सुविधा
डॉ. वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व्याधींवर विशेष उपचार केले जातील. त्यांना साडेतीन दशकांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे. यात गर्भाशयाचा ट्युमर, कॅन्सर आणि दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची शस्त्रक्रिया, नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन प्रसूतीची सोय, अंडाशयाच्या गाठी, पांढरे पाणी जाणे आणि हार्मोनल समस्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, मासिक पाळीतील त्रास आणि अनियमितता यावर विशेष सल्ला देण्यात येणार आहे.
महिलांनी आपल्या आरोग्य समस्यांसाठी वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी 9112030055, 9112040055, 9325150004, 0257-2231007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत