रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा - डॉ. सोळंके डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंधावर संयुक्त सभा
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा - डॉ. सोळंके
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंधावर संयुक्त सभा
लेवाजगत न्यूज जळगाव - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायदा अंमलात आला आहे. रॅगींग करणे हा कायद्याच्यादृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून विद्यार्थ्यांनी याबाबत जागरूक राहावे असे आवाहन अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रॅगींग प्रतिबंधात्मक संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. सी.डी. सारंग, रूग्णालय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, कांचन रोटे, प्रा. शैलेश राणे महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिव शिवराज दाभाडे, स्वराज सुर्या यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. संयुक्त सभेच्या सुरूवातीला प्रा. डॉ. बापुराव बिटे यांनी रॅगींग या प्रकाराविषयीची माहिती आणि त्याचे परिणाम याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना सांगितले की, पदव्युत्तर वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना आदराची भावना ठेवली पाहीजे. कुठल्याही परीस्थितीत महाविद्यालयात रॅगींग खपवून घेतली जाणार नाही. रॅगींग करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रकार असल्याचे डॉ. सोळंके यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी देखील विद्यार्थ्यांना रॅगींग प्रतिबंधाविषयीच माहिती देत महाविद्यालयाचा परिसर हा रॅगींग मुक्त परिसर असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी रॅगींग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला एमबीबीएस अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील लिपीकांसह सहकार्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत