डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भक्तीमय वातावरणात रामजन्मोत्सव साजरा
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भक्तीमय वातावरणात रामजन्मोत्सव साजरा
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयम येथे रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची विधीवत पूजा करण्यात आली, तर राजपुरोहित डी.टी. राव यांनी मंत्रोच्चार करून धार्मिक विधी पार पाडले.
यावेळी श्रीरामाची महाआरती करण्यात आली असून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डॉ. विजय बाविस्कर, पियुष भंगाळे यांच्यासह अन्नपुर्णालयमचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अन्नपुर्णालयम येथे गर्दी केली होती. तसेच या निमित्ताने गीत रामायणावर आधारित भजनसंध्येचेही सुंदर आयोजन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत