सभासद गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
सभासद गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
लेवाजगत न्यूज जळगाव प्रतिनिधी :-खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव जिल्हा जळगाव यांच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र निकम, महासचिव विठ्ठल उरमुडे, अहिल्यानगर सचिव शेखर उंडे, सदस्य अमोल शिंदे, नाशिक टीडीएफ संघटक दिनेश देवरे, राज्य कार्यकारिणी सदस्य हेमंतकुमार पाटील, देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष राकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्याध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सांगितले की, या गुणगौरव सोहळ्यात सन्मानित होणारे विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवतील. तर महासचिव विठ्ठल उरमुडे यांनी खाजगी प्राथमिक पतसंस्था आणि खाजगी प्राथमिक संघ यांच्यातील उत्तम समन्वयामुळे जळगाव जिल्ह्यात असे नाविन्यपूर्ण उपक्रम होत असल्याचे सांगून त्याचे कौतुक केले.
संस्थेचे कार्य हे सभासदांच्या हितासाठी असून संस्था राबवत असलेल्या विविध योजना प्रेरणादायी असल्याचे मतही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष, माजी संचालक, सर्व सभासद बंधू तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक सुनील पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक गणेश लोडते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे अध्यक्ष अमित चौधरी, उपाध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी अध्यक्ष प्रसन्ना बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संतोष मराठे, संचालक प्रशांत साखरे, रूपाली पाटील, स्वाती फिरके, प्रफुल्ल सरोदे, वना महाजन, धनंजय काकडे, अविनाश घुगे, तज्ञ संचालक महेंद्र रामोसे, मोहन पालवे तसेच संस्थेचे कर्मचारी सचिन पाटील, सागर जावळे, महेश पाटील आणि सहयोगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत