रावेर तालुक्यात ११ मार्चपासून मोफत नेत्रतपासणी शिबीर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उपक्रम; गरजू रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया
रावेर तालुक्यात ११ मार्चपासून मोफत नेत्रतपासणी शिबीर
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उपक्रम; गरजू रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया
जळगाव | लेवाजगत न्यूज :
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने रावेर तालुक्यात ११ मार्चपासून मोफत नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रावेर तालुक्यातील प्रत्येक गावात हे शिबीर होणार असून तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत रुग्णालयातर्फे नियमितपणे विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. सेवेचा ध्यास घेतलेल्या या रुग्णालयात आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दिलासा देण्यात आला आहे. रावेर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने या विशेष नेत्रतपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रुग्णालयातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा गरजू रुग्णांवर जळगाव येथील रुग्णालयात मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराचे नियोजन असे
या नेत्रतपासणी शिबिराची सुरुवात ११ मार्च रोजी लहान वाघोदे येथून होणार असून त्याच दिवशी थोरगव्हाण, चुनवाडे व मांगी येथे शिबिर होणार आहे.
यानंतर १३ मार्च रोजी सूदगाव, रायपूर, गहुखेडे, कठोरे;
१६ मार्च रोजी रणगाव, तासखेडे, उदळी खु., उदळी बु.;
१८ मार्च रोजी गाते, लूमखेडा, मंगलवाडी, तांदलवाडी;
२० मार्च रोजी मस्कावद, दसनूर, आंदलवाडी, सुनोदा;
२३ मार्च रोजी सिगत, बलवाडी पुरी, गोलवाडे;
२५ मार्च रोजी निंभोरा, खिर्डी बु., खिर्डी खु., भामलवाडी;
२७ मार्च रोजी अजंदे, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी;
३० मार्च रोजी धामोडी, कांडवेल, कोळदा, सुलवाडी;
६ एप्रिल रोजी निंबोल, विटवा, सांगवे, नांदुरखेडा;
८ एप्रिल रोजी पुणखेडे, पातोंडी, बोहर्डे, निंभोरा सिम;
१० एप्रिल रोजी खिरवळ, थेरोडे, धुरखेडे, नेहते;
१५ एप्रिल रोजी तामसवाडी, मोरगाव बु., मोरगाव खु., दोधे;
१७ एप्रिल रोजी वाघोड, अटवाडे, अजनाड, चोरवड;
२० एप्रिल रोजी खानापूर, नेरूळ, पाडळे बु., पाडळे खु.;
२२ एप्रिल रोजी कर्जद, अहिरवाडी, मोहगण, पिंपरी;
२४ एप्रिल रोजी बोरखेडे, भोकरी, केर्हाळे बु., केर्हाळे खु., जुनोने;
२७ एप्रिल रोजी रसलपुर, बक्षीपुर, रमजीपुर, खिरोदा प्र. रावेर;
२९ एप्रिल रोजी अभोळे बु., अभोळे खु., जिन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी;
४ मे रोजी शिंदखेडा, मुंजलवाडी, कुसुंबा, लालमाती, सहस्त्रलिंग;
६ मे रोजी भातखेडा, ऊटखेडा, गौरखेडा, लोहारा;
८ मे रोजी मोठा वाघोदा, वडगाव, विवरा, भोर (रावेर स्टेशन);
११ मे रोजी कोचुर, चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा;
१३ मे रोजी रोझोदा, खिरोदा, कळमोदा, जानोरी;
१५ मे रोजी पाल, गारखेडे, निमड्या, अंधारमळी;
आणि १८ मे रोजी तिड्या, मोहमांडली व गारबर्डी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यातील नागरिकांनी या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत