Contact Banner

सावद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याचे पूजन; पुतळा उभारणीला प्राधान्य – भरत नेहते

 

savdyat-chhatrapati-shivaji-maharaj-jayanti-nimit-putalyache-poojan-putala-ubharanila-pradhanya-bharat-nehete


सावद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याचे पूजन; पुतळा उभारणीला प्राधान्य – भरत नेहते

लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :सावदा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुभाष चौक, मोठा आड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आज शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. स्वामीनारायण मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश दासजी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख भरत नेहते यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून फैजपूर रोडवरील वाय पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सध्या सुरू असून पुतळा उभारणीला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढणे जाणीवपूर्वक रद्द करण्यात आली आहे. नागरिकांकडून विनाकारण देणग्या गोळा करून मिरवणुकीवर खर्च करण्यापेक्षा त्या निधीचा उपयोग पुतळा उभारणीसाठी व्हावा, अशी आमच्या शिवसेनेची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पुतळ्यासाठी लागणारी जागा दानशूर व्यक्तिमत्व कै.विष्णू हरी पाटील यांच्या कुटुंबियांनी सामाजिक भावनेतून मोफत उपलब्ध करून दिली असून त्या ठिकाणी पुतळा उभारणीचे नियोजन आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भरत नेहते यांनी दिली.

या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, वामन भारंबे, शरद भारंबे, अतुल नेहते,प्रमोद भंगाळे, मोहन भंगाळे,नगरसेविका जयश्री नेहते, विजया जावळे, नगरसेवक सचिन बराटे, माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील, शांताराम भंगाळे,यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.