श्रीराम महाजन यांचे "माझे अक्षर, माझी ओळख" पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
श्रीराम महाजन यांचे "माझे अक्षर, माझी ओळख" पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
उरण :सुनिल ठाकूर -अक्षरसाधना पब्लिकेशन प्रकाशित श्रीराम साहेबराव महाजन लिखित 'माझे अक्षर, माझी ओळख' पुस्तक प्रकाशन सोहळा चेंबूर कर्नाटका हायस्कूल मध्ये उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली,
चेंबूर कर्नाटका हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमास आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले.
गणेश वंदना, गुरुवंदना, लावणी नृत्यांनी कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. त्यांनतर महाजन सरांचा जीवन प्रवास यावर डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली.
आलेल्या पाहुण्याचा परिचय सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका अनघा जाधव यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रीराम महाजन व मेघा महाजन यांनी सन्मानचिन्ह, शाल, पेपर बुके, पुस्तक देऊन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत एस. नाईक (अध्यक्ष, चेंबूर कर्नाटका संघा), डॉ. गणेश तरतरे.(सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, माजी प्राध्यापक/प्रसिद्ध चित्रकार/लेखक), डॉ. गजानन सिताराम शेपाळ ( चित्रकार/रंग चिकित्सक/प्रकाशक/लेखक ), राम कस्तुरे ( आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार ), सु.बा.माळी ( सेवानिवृत्त, शिक्षण उपसंचालक आयुक्त कार्यालय, पुणे महाराष्ट्र ),
डॉ. गीतांजली सालियन (प्राचार्या, चेंबूर कर्नाटका हायस्कूल, चेंबूर मुंबई) उपस्थित होते. तसेच शाळेचा उपप्राचार्या अर्चना पुजारी, पर्यवेक्षिका निशा विश्वकर्मा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कला शिक्षक, पत्रकार, कवी, लेखक , आजी व माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम महाजन यांनी पुस्तकांविषयी संपूर्ण माहिती त्यांच्या मनोगतात व्यक्त केली. हे पुस्तक
माझे संपूर्ण जीवन, कला प्रवास त्यांच्या संपन्नतेची व समाधानाची वाटचाल करीत आहे. ते माझे वडिल (नाना) कै. साहेबराव रामचंद्र महाजन यांच्या पवित्र स्मृतीस व आई श्रीमती द्वारकाबाई महाजन यांच्या चरणी त्यांनी अर्पण केले. नवीन पिढी अक्षरांपासून दूर चालली आहे, त्यांना पुन्हा एकदा अक्षरांचे ओळख व्हावी, त्यांचे अक्षर स्वच्छ, सुंदर, कळणदार व्हावे यासाठी हे पुस्तकांची निर्मिती केली आहे, असे लेखन महाजन सरांनी यावेळी बोलतांना सांगितले.
सर्व प्रमुख पाहुण्यांनी पुस्तकांविषयी सुरेख आपली मते मांडली राम कस्तुरी यांनी अक्षर लेखनावर सुंदर माहिती दिली. हर्षाली नलावडे व संग्राम इंगळे या विद्यार्थ्यांनी सरांविषयी सुंदर अशी माहिती आपल्या भाषणात दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन मेघा महाजन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद कुरणे, गजानन पाटील, राजू आवाडे, जितेंद्र आहिरराव, समाधान रोकडे यांनी अधिक परिश्रम घेतली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत